जळगाव : कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेदमुत धरणे आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलनात सहभागी २०० जणांविरोधात शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांनी शुक्रवारी भेट देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात होते. ५ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपासून ते ६ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सार्वजिनक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडविला. तसचे कोरोना पार्श्वभूमीवर जमाव बंदीचे आदेश असतांनाही अनावश्यक गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कार्डिले, तारांचद बारेला, अतुल गायकवाड, केशव वाघ यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कलम ३४१, १४३, १८८ साथरोग प्रतिबंध कायदा कलम २, ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.