शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

गाडी खरेदीतून सव्वा कोटींना गंडा, डिलरविरोधात गुन्हा, पैसे घेऊनही कार देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 9:13 AM

Crime News : उरण परिसरात राहणाऱ्या तीन व्यावसायिकांनी ओळखीतून नेरुळमधील गोल्डन मोटर्समध्ये मर्सिडिज कारसाठी चौकशी केली होती. यावेळी त्यांना इतर डिलरपेक्षा स्वस्तात कार मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.

नवी मुंबई : कार खरेदीसाठी पैसे देऊनही डिलरने कार न दिल्याने डिलर विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांची एकूण १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे इतर कोणाची फसवणूक झाली आहे का याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

उरण परिसरात राहणाऱ्या तीन व्यावसायिकांनी ओळखीतून नेरुळमधील गोल्डन मोटर्समध्ये मर्सिडिज कारसाठी चौकशी केली होती. यावेळी त्यांना इतर डिलरपेक्षा स्वस्तात कार मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार संबंधितांना पाहिजे असलेली मर्सिडीज कार ७८ लाखऐवजी डिस्काउंटमध्ये ४५ लाखाला मिळणार होती. यामुळे तिघांनी एकूण १ कोटी १५ लाख रुपये गोल्डन कारचे संदीप कांदोळकर ऊर्फ संतोष वेंगुर्लेकर व विक्रम तेलोरे यांच्याकडे दिले होते.

परंतु फेब्रुवारीमध्ये हा व्यवहार होऊन देखील अद्यापपर्यंत त्यांना कार देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता ते देण्यास देखील टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता बुधवारी नेरुळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर अशाप्रकारे इतर कोणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. नागरिकांनी सावधपणे व्यवहार करावा असे आवाहन केले आहे.

कोट्यवधींचा अपहार या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने कांदळकर व तिलोरे यांना अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी महागड्या गाड्यांच्या व्यवहारातून अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला असल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीNavi Mumbaiनवी मुंबई