पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांनी जमाव बंदीचे उल्लंघन करुन मध्यरात्री भररस्त्यावर वाढदिवसाचाकेक कापून तेथे असलेल्या नागरिकास धमकविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुपेश मारणे व त्याच्या ७ ते ८ समर्थकांवर याच्यावर समर्थपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनांचा टोल न दिल्याने कुख्यात गुंड गजा मारणेवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा
ही घटना रास्ता पेठेतील चैतन्य इंग्लिश मेडियम स्कुल येथील रस्त्यावर १४ फेब्रुवारी रोजी घडली होती. समर्थ पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव व बालाजी शिंदे हे १४ फेब्रुवारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चैतन्य इंग्लिश मेडियम स्कूलजवळ एक व्यक्ती घाबरलेली दिसली. त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने एक दाढी वाढलेली व्यक्ती रस्त्यावर वाढदिवस साजरा करत आहे. त्या व्यक्तीला वाढदिवस साजरा करणार्या व्यक्तीने दमबाजी केली. तसेच, काय बघतोस माज आला का, मी रुपेशदादा मारणे पुण्याचा भाई. तुलाही केक सारखा कापेल, असा दम दिला. त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी गेल्यानंतर रुपेश व त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यानंतर घाबरलेला तरुण देखील निघून गेला. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती घेतली असता आरोपींनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तसेच, पोलिसांच्या नियमांचे पालन केलेले दिसून आले नाही. त्यानंतर विविध कायद्यानुसार रुपेश मारणेसह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.