लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दि महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांसह २६ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. बायोमेट्रिक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
डोंबिवलीचे रहिवासी असलेले चार्टर्ड अकाऊंटंट मोहन शंकर मोहिते (६२) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. आरोपानुसार, १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली. संस्थेत कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ आणि अन्य आरोपींनी मिळून संस्थेच्या बायोमेट्रिक हजेरी मशीनमध्ये बनावट नोंदी केल्या. त्याबद्दल जास्तीचा कामकाज भत्ता घेत ६३ लाख ३३ हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रकाश सिद्धप्या डांगे, प्रकाश दगू खांगळ, मोहन बापू गोरे, विजय अपराध, शांताराम कांबळे, प्रताप सकपाळ, कृष्णदेव सोनवणे, किशोर खटावकर, अनंत शंकर दळवी, रामचंद्र गोपाळ तावडे, सुशील रामचंद्र तावडे, सुनील कृष्णाजी चव्हाण, वैशाली राजेश सांवत, विठ्ठल जिजावा घुले, ईश्वर जयराम सोनार, मधुसूदन कमलाकर राणे, अपिता अमृत मंत्री, रीना अमित राणे, रंजिता जितीन पाटील, सुमन संदीप दळवी, राहुल वसंत तावंडे, अमित प्रकाश खांगळ, लक्ष्मीकांत रवींद्र जोगल, पिटू दुधनाथ शर्मा, प्रमोद गणपत सावंत, संकेत दिलीप ढवण यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.