मीरारोड - मीरारोडमधील एका इमारतीती राहणाऱ्या महिलेने तिच्या राहत्या सदनिकेत एक अतिरिक्त दरवाजा आणि खिडकी काढली म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने ते बांधकाम बेकायदा ठरवून त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.महापालिकेच्या प्रभाग समिती ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिलेल्या फिर्यादी नुसार जय सुरभी इमारतीतील सदनिका धारक गायत्री बादुलकर यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .शिवार उद्यान जवळील देव पॅरेडाइज संकुला लगत असलेल्या जय सुरभी इमारतीत गायत्री बादुलकर यांची सदनिका आहे . सदर सदनिकेत त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता अतिरिक्त दरवाजा आणि अतिरिक्त खिडकी काढली होती. सप्टेंबर महिन्यात गायत्री यांना पालिकेने नोटीस बजावून सदर अतिरिक्त दरवाजा व खिडकी काढून घेण्यास सांगितले होते . परंतु ते काढून न घेतल्याने अनधिकृत बांधकाम केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
घरात अतिरिक्त दरवाजा व खिडकी बनवली म्हणून महिलेवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:36 PM