कल्याण - कल्याण परिमंडळ च्या अँटी रॉबरी पथकाने जून महिन्यात बँकेवर दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 9 जणांसह त्यांच्या फरार म्होरक्याला गजाआड केले होते. या टोळीकडून महारष्ट्रासह कर्नाटक राज्यात एकूण 35 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून अद्याप महात्मा फुले, मानपाडा, कोलशेवाडी, नारपोली, निजामपुरा या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. या 10 अट्टल दरोडेखोरांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 24 जून रोजी पेट्रोलिंग दरम्यान कल्याण परिमंडळ 3 च्या अँटी रॉबरी पथकाने मुरबाड रोडवर पेट्रोलिंग करीत असताना याच परिसरातील एक बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह 10 जणांच्या टोळीला गजाआड केले होते. या अटक दरोडेखोरांच्या तपासात महात्मा फुले पोलीस स्थानकात 9, मानपाडा 3 तर कोलसेवाडी, नारपोली, निजमपुरा प्रत्येकी 1 गुन्ह्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी या टोळीकडून सुमारे साडे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही टोळी आंतरराज्यीय असून महाराष्ट्रातील कल्याण ,भिवंडी, मानपाडा, चाळीसगाव,औरंगाबाद,आदी शहरासह कर्नाटक मधील सिंदगी आदी ठिकाणी 35 गुन्हे दाखल असून हे चोरटे आंध्र प्रदेश व चेन्नई राज्यातील राहणारी आहे. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने सदर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.मोक्काअंतर्गत आरोपींची नावेइलियाराज राजशेखर(30),संजय नायडू (25), बेंजीमन इरगदिनल्ला (26), दासू येड्डा (28), सालोमन गोगुला (29), अरुण कुमार पेटला (24), राजन गोगुल (46),मोशा याकूब (30), डॅनियल अकुला (25), चिनना गोगुला या दहा दरोडेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.