शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

‘त्या’ दागिन्यांवर मावस बहिणीचाच डल्ला; चपलेवरून लागला सुगावा, २४ तासात गुन्ह्याची उकल

By प्रशांत माने | Published: January 16, 2023 3:33 PM

मानपाडा पोलिसांनी या गुन्हयाचा छडा २४ तासात लावला असून प्रिया यांच्या मावस बहिणीनेच या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे.

डोंबिवली - लोढा पलावा येथील क्र्ला बिल्डींगमध्ये प्रिया सक्सेना यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने २० लाख रूपये किमतीचे ४० तोळे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी ५.३० ते शुक्रवारी रात्रौ ११.३० च्या दरम्यान घडली होती. दरम्यान मानपाडा पोलिसांनी या गुन्हयाचा छडा २४ तासात लावला असून प्रिया यांच्या मावस बहिणीनेच या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. सिमरन पाटील (वय २७) रा. कामोठे नवी मुंबई असे आरोपी महिलेचे नाव आहे.

सिमरन ही गेले १५ दिवस प्रिया यांच्याकडे वास्तव्याला होती. शुक्रवारी दोघी नवी मुंबईतील कामोठे येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी सिमरन हिने प्रिया यांच्या पर्समधील घराची चावी आणि इमारतीत प्रवेश करण्यासाठी लागणारे कार्ड असे काढून घेतले आणि प्रिया यांची नजर चुकवून सिमरन रिक्षाने लोढा पलावा येथील घरी आली. चावीने दरवाजाचे लॉक उघडले  घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरले आणि पुन्हा दरवाजा बंद करून ती पुन्हा कामोठे येथील कार्यक्रमात पोहोचली. चाव्या पुन्हा पर्समध्ये ठेवण्याचा तिचा डाव होता. मात्र तत्पुर्वी आपल्या पर्समधून चाव्या आणि कार्ड गायब असल्याचे प्रियाच्या निदर्शनास पडले आणि तिने थेट आपले घर गाठले पण दरवाजा कुलुपबंद होता. लॉक तोडून प्रिया यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातून दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. गुन्हयाच्या तपासकामी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे आणि सुनिल तारमळे यांचे पथक नेमले होते.

सिमरन रिक्षातून लोढा पलावा येथे आली. तिला कोणी ओळखू नये यासाठी सिमरन हिने तिच्या अंगावरील ड्रेसवर वन पीस परिधान केला तसेच तोंडाला स्कार्फ लावला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये आपला चेहरा दिसणार नाही याची तिने दक्षता घेतली होती. परंतू तिच्या चप्पलने घात केला आणि त्यावरून ती घरात येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. सिमरन काही दिवस प्रिया यांच्या घरी रहायला आली होती. तेव्हा तिने घराची रेकी केली होती आणि दागिने चोरण्याचा प्लॅन रचला होता. तो यशस्वी देखील झाला पण तिच्याच चपलांमुळे तो उघडा पडला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी