मीरारोड - लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी लोकलने प्रवास करण्यासाठी भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर कोविड आदी कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्या मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले जाणार होते .
परंतु आज मीरा भाईंदर मधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानका बाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना रेल्वे स्थानकात प्रवेशच करू दिला नाही . पोलिसांचा बंदोबस्त आणि पोलिसांनी स्थानकात जाण्यास मनाई केली . त्या नंतर मनसैनिकांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी २१ मनसैनिकां वर जमावबंदी आदेश , कोविड अधिनियम आदींचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार
मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू
अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल
एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त
मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते, रामदास आठवलेंचा पायलला पाठिंबा