वर्धा : भाजपच्या कार्यालयात प्रदेश सचिवपदी राजेश बकाने यांची नियुक्ती झाल्याने रविवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने रामनगर पोलिसांनी हा कार्यक्रम थांबविण्याची सूचना केली. याप्रकरणी रविवारी भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांसह ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी भाजपचे वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर, महासचिव राजेश बकाने यांच्यासह वर्धा पालिकेच्या सहा नगरसेवकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीत राजेश बकाने यांची सचिवपदी निवड झाल्याने धंतोली येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ३०० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित झाल्याने याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भाजप कार्यालय गाठून गर्दी पांगविली.
कोरोना काळात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी १६ पदाधिकाऱ्यांसह ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सखोल चौकशीअंती सोमवारी या प्रकरणात आमदार डॉ. पंकज भोयर, नवनियुक्त महासचिव राजेश बकाने, नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेविका नरेश कोलते, वंदना भुते, श्रेया देशमुख, सुरेश आहुजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रामनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल यांनी सांगितले. यापूर्वी संचारबंदीच्या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपासाठी घराजवळ बोलावून गर्दी केल्याने आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव
साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस