शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

संतापजनक! 13 वर्षीय मुलीवर 16 जणांकडून बलात्कार; पित्याने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 6:10 PM

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना घ़डली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर झालेल्या 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घ़डली आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. मुलीच्या वडिलांनी अंगावर काटा आणणारी ही घटना सांगितली आहे. 

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी मुलगी जंगलामध्ये बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा चार पाच जणांनी तिला गाठलं.  एकानं तिचा चेहरा दाबला आणि दुसऱ्यानं तिला चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. यानंतर आणखी काही लोकही आले आणि त्यांनी मुलीवर बलात्कार केला. मुलीने त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि ती घरी आली. घरी आल्यावर तिने वडिलांनी तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली आहे. 

मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना भरतपूरच्या खोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी 11 फेब्रुवारी रोजी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. 12 फेब्रुवारी रोजी वडिलांनी बेपत्ता मुलीची नोंद करण्यासाठी त्यांनी खोह पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी मुलगी घरी परतल्याचं आढळून आलं. मुलीने घरी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेली सर्व घटना सांगितली. वडिलांनी 13 फेब्रुवारीला गँगरेपची तक्रार दाखल केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी