शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सोनसाखळ्या हिसकावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:22 AM

दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीने चोरटे सक्रिय झाले आहेत. यात खरेदीकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज हिसकावून घेतला आहे.

पुणे - दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीने चोरटे सक्रिय झाले आहेत. यात खरेदीकरिता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज हिसकावून घेतला आहे. विशेषत: महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत चोरट्यांनी महिलांकडील सोन्याचे दागिने हिसकावून नेले.वारजे भागात मुंबई-बंगळुरू मार्गावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चांदणी चौकातील वेदभवननजीक एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणातील तक्रारदार महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नाना पेठेत चोरट्यांनी ढकलून दिल्याने महिला किरकोळ जखमी झाली. अनुतेज सिंफनी सोसायटीच्या आवारात पाडव्याच्या गुरुवारी (दि. ८) दिवशी ही घटना घडली. एका ५२ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारातून जात होती. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ९५ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.चोरटा महिलेला ढकलून पसार झाला. झटापटीत तक्रारदार महिलेला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. सहायक फौजदार एम. बी. बढे तपास करीत आहेत.डायस प्लॉट येथे नागरिकांनी चोरट्याला पकडलेगुलटेकडीतील डायस प्लॉट भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक महिला सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडी भागातून जात होती. त्या वेळी एकाने तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी विशाल काते (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी