नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘डिजिटल रेप’ प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी २१ जानेवारी २०१९ रोजी नोएडा सेक्टर ३९ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सालारपूर गावातील साडेतीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेपप्रकरणी सूरजपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मंगळवारी ६५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा हा निर्णय देशातील डिजिटल रेप प्रकरणात पहिली शिक्षा असल्याचे म्हटले जात आहे.अकबर अली असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील गावचा रहिवासी आहे. २०१९ मध्ये अली आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी नोएडा सेक्टर ४५ मधील सालारपूल गावात आला होता. त्यादरम्यान त्याने शेजारच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावले आणि घरातच त्याने मुलीवर डिजिटल रेप केला.
डिजिटल रेप म्हणजे काय?डिजिटल रेपचा सायबर गुन्ह्यांशी किंवा स्क्रीनवर केलेल्या लैंगिक गुन्ह्यांशी किंवा इंटरनेटद्वारे शोषण केल्याशी काहीही संबंध नाही. संमतीशिवाय जबरदस्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये बोटे आणि पायाची बोटे घुसवण्याची ही कृती आहे. इंग्रजीत ‘डिजिट’ या शब्दाचा अर्थ पायाचे बोट, बोट आणि अंगठा असा होतो. म्हणून संमतीशिवाय ‘डिजिट’ जबरदस्तीने घुसवण्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत केले जाते. पूर्वी अशी कृत्ये विनयभंग मानली जात होती.