- मंगेश कराळेनालासोपारा - घरफोडी करणाऱ्या सराईत घरफोड्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. आरोपीकडून पोलिसांनी ९ गुन्ह्यांची उकल करून ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याचा एक साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे. ही माहीती बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांमध्ये विरार पोलीस ठाणे हद्दित दिवसा व रात्री चोरी आणि घरफोडीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. याबाबत विरार पोलीस ठाणे येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. नमुद गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सदर गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सुरु करुन प्रत्येक गुन्ह्राच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरुन तांत्रीक पुरावे व माहिती हस्तगत करुन आरोपीच्या वास्तव्याची माहिती काढली. विरार पोलिसांनी नालासोपाऱ्याच्या ओमनगर परिसरातून प्रथमेश शिवराम पवार (२४) या सराईत घरफोड्या करणाऱ्याला सोमवारी ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्राच्या अनुषंगाने केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्रातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ९६.४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सचिन ओलेकर, सागर घुगरकर, दत्तात्रय जाधव यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन लोखंडे करीत आहे.
१) आरोपी हा सराईत असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. मागे आरोपीला तडीपार करण्यात आले होते. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - सुहास बावचे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)