राधानगरी - राधानगरी परिसरातील सावर्धन येते वन्यप्राण्यांच्या मांसाचे तुकडे करून वाटे घालीत असताना. वन्यजीव विभागाच्या पथकाकडून तीन आरोपीना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
या वेळी वनक्षेत्रपाल एस एस पाटील, सहाय्यक वनरक्षक एस व्ही कांबळे वनरक्षक एम आर वंजारे,वन मजूर बळवंत राठोड, मारुती पाटील, यांच्या पथकाकडून सावर्धन येथील हडक्याचा माळ येथे छापा टाकून भेकर प्राण्याच्या मांसाचे तुकडे करून वाटे घालीत असताना कोडीबा तुकाराम डवर( वय 59), राजेंद्र भरत पाटील (वय 47), ओंकार बळवंत पत्ताडे (वय 21)सर्व रा.सावर्धन ता राधानगरी या आरोपीना ताब्यात घेऊन यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनअपराधचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास विशाल माळी विभागीय वन अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. पाटील वनक्षेत्रपाल राधानगरी. एस. व्ही कांबळे वनपाल अडोली, अतिरिक्त कार्यभार पडळी ए डी कुंभार वनरक्षक करिवडे हे करीत आहेत.