शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अंधश्रद्धेचा कळस! नदीकिनारी आढळला 5 वर्षीय मुलीचा मृतदेह अन् 'या' भयंकर वस्तू; नरबळीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:01 PM

Crime News : पाच वर्षांच्या एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - देशात अद्यापही काही ठिकाणी अंधश्रद्धा पाहायला मिळते. तांत्रिक-मांत्रिकाला भुलून अनेक भयंकर प्रकार केले जातात. नरबळीसारखे अघोरी प्रकारही पाहायला मिळतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आसाममध्ये घडली आहे. पाच वर्षांच्या एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयास्पद अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी एका मांत्रिकाला देखील अटक केली आहे. आसामच्या चराइदेव जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या या मुलीचं सोमवारी रात्री झोपेत असताना काही अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं. तिच्या मोठ्या बहिणीने मंगळवारी सेफराई पोलीस ठाण्यात आपली लहान बहीण हरवल्याची तक्रार दाखल केली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री या चिमुकलीचा मृतदेह सिंगलू नदीत सापडला. त्या वेळी नदीच्या काठावर तांत्रिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू आणि एक लाल कापड सापडलं.

 घटनास्थळी सापडलेल्या वस्तुंवरून हा एक नरबळीचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना आला आहे. या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी एका तांत्रिकाला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या मुख्य मांत्रिकाला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. तसेच या मुलीच्या वडिलांसह दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून यात मिळालेले पुरावे पाहता नरबळीची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही आदिवासीबहुल भागातील चहाच्या मळ्यांमध्ये नरबळीच्या घटना घडल्या आहेत. 2016 मध्येही एका चहाच्या मळ्यातील चार वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाली होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता अशीही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAssamआसामIndiaभारत