नवी दिल्ली - आसाममध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मोरीगन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्ससाठी एका बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. गुवाहाटीपासून जवळपास 80 किमी दूर असलेल्या लहरीघाट गावात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा खुलासा झाला आहे. तक्रारीनुसार, आरोपी अमीनुल इस्लाम याने आपल्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या व्यक्तीला विकलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल होताच अधिक वेगाने तपास सुरू केला.
अमीनुल इस्लाम आणि साजिदा बेगम या दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. मुलाची आई रुक्मिना बेगम नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरी राहात होती. ड्रग्सच्या सेवनावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे तिने आपल्या वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला. एक दिवस आरोपी अमीनुल तिच्या घरी आला आणि मुलाचं आधारकार्ड बनवायचं आहे, असं सांगून घेऊन गेला. मात्र दोन-तीन दिवस मुलाला परत पाठवलं नसल्याने रुक्मिनाला थोडा संशय आला. मुलाला विकल्याची माहिती मिळताच तिला मोठा धक्काच बसला.
अखेर 5 ऑगस्टला तिने पोलिसात तक्रार दिली आणि मुलाला ताब्यात घेतलं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. तक्रारीनुसार, मोरीगावच्या लहरीघाट गावात साजिदा बेगमला मुलगा विकल्याचं सांगितलं. ड्रग्स विकत घेण्यासाठी 40 हजारांना विकलं. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तपास करत मुलाला साजिदाच्या ताब्यातून सोडवलं आणि आईकडे सोपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी कारमध्ये चार तरुणी होत्या आणि चौघीही दारूच्या नशेत होत्या. मद्यधुंद अवस्थेत तरुणीने डिलिव्हरी बॉयला उडवल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.