नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सुबेहा पोलीस ठाण्याच्या पंडित पुरवा गावात भयंकर घटना घडली. भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. घरापासून 20 मीटर दूर अंतरावर मृतदेह आढळला आहे. काही अज्ञात लोकांनी भाजपाच्या नेत्याची हत्या केली असून यामागे संपत्तीचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपा नेत्याच्या घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजपा नेत्याच्या पत्नीचं दोन महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे ते सध्या घरी एकटेच राहत होते. हरिहर सिंह असं 65 वर्षीय नेत्याचं नाव असून संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच त्यांच्या गळ्यावर काही खूणा सापडल्या. स्थानिक पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा अधिक तपास करत आहेत.
भाजपा नेत्याचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता. त्यामुळेच संपत्तीच्या हव्यासापोटी नातेवाईक किंवा गावातील काही लोकांनी हत्या केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी कारमध्ये चार तरुणी होत्या आणि चौघीही दारूच्या नशेत होत्या.
भयंकर! मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू
मद्यधुंद अवस्थेत तरुणीने डिलिव्हरी बॉयला उडवल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. विजय नगर येथून पार्टी करून कारमधून या तरुणी राजेंद्र नगरसाठी रवाना झाल्या होत्या. गार्गी माहेश्वरी नावाची तरुणी कार चालवत होती. ती एमआयजी कॉलनीत राहणारी आहे. तरुणी खूप फास्ट कार चालवित होती. यादरम्यान अचानक नियंत्रण सुटल्यामुळे तीनदा पलटी होऊन कार दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. याच दरम्यान देवीलाल नावाचा डिलिव्हरी बॉय कारखाली आला. देवीलाल याच्या अंगावरुन कार गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.