तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:09 PM2021-08-23T17:09:40+5:302021-08-23T17:17:14+5:30

Crime News : छोट्या मुलांवरून पालकांमध्ये देखील मोठी भांडणं होतात. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.

Crime News bhopal 4 men jointly attacked childs father with sword serious head injury police registered fir | तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला

तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला

Next

नवी दिल्ली - खेळताना लहान मुलांमध्ये हमखास भांडणं होत असतात. कधी कधी ही भांडणं टोकालाही जातात. त्यावेळी पालक आवर्जून यामध्ये हस्तक्षेप करतात. छोट्या मुलांवरून पालकांमध्ये देखील मोठी भांडणं होतात. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये रक्तपात झाला आहे. मुलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण आणि हाणामारी झाली. याबाबत समजल्यानंतर दोन्ही मुलांचे पालक आक्रमक होत एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली.

पालकांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला तलवार लागली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपुरा भागात पंकज सोनी आणि त्यांचं कुटुंब राहतं. पंकज हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या मुलाशी शेजारी राहणाऱ्या एका मुलाचं भांडण झालं. शेजारच्या मुलाने सोनी यांच्या मुलाला मारहाण केली. 

रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला या गोष्टीची तक्रार करण्यासाठी ते शेजारी गेले. मुलांच्या भांडणाच्या तक्रारी आपल्याकडे का घेऊन येता, असा सवाल करत शेजारील पंचोली कुटुंबातील सदस्यांनी आपल्यावर हल्ला चढवल्याचं सोनी यांनी म्हटलं आहे. तुमच्या मुलाला मारलं तसंच आता तुम्हालाही मारतो, असं म्हणत या कुटुंबातील लोक आपल्या अंगावर धावून आल्याचा दावा सोनी यांनी केली आहे. पंचोली कुटुंबातील एका सदस्याने सोनी यांच्या डोक्यातच तलवार मारली. 

सोनी यांच्या डोक्याला झालेली जखम गंभीर असल्याने तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सोनी यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नसल्याची माहिती आहे. पंचोली कुटुंबातील सदस्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News bhopal 4 men jointly attacked childs father with sword serious head injury police registered fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.