लखनौ - उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात एका ज्वेलर्सच्या घरावर दरोडा घालून दरोडेखोरांनी कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी एक किलो सोने आणि तब्बल एक क्विंटल चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लांबवला. तसेच चोरांनी रोख रक्कमही लांबवली आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
हत्यारबंद असलेल्या दरोडेखोरांनी रविवारी रात्री सराफा व्यापारी कृष्णकुमार सोनी यांच्या घरावर हा दरोडा घातला. त्यांनी तिथून एक किलो सोने आणि एक क्विंटल चांदी लुटली. आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. जालौनचे पोलीस अधीक्षक रवीकुमार यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी रविवारी रात्री गँस कटरच्या मदतीने सयाफा व्यापारी कृष्ण कुमार सोनी यांच्या घराचा दरवाजा कापला. त्यानंतर तिथे लावलेले सीसीटीव्ही कँमेरे उलट्या दिशेने फिरवले आणि घरात प्रवेश केला. मग घरात ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरले. आवाज ऐकून व्यापाऱ्याची आई आणि धाकटा भाऊ जागे झाले. मात्र दरोडेखोरांनी त्यांना खोलीत कोंडून ठेवले.