नवी दिल्ली - बिहारच्या छपरा जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना घडली आहे. पत्नीने सोबत येण्यास नकार दिला म्हणून पती अल्पवयीन मेहुणीला घेऊन फरार झाला आहे. गडखाच्या कदना गावातील एक व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरी पोहोचला पण त्याच्या सासरच्या मंडळींनी पत्नीला त्याच्यासोबत पाठवलं नाही. यानंतर त्याने आपल्या एका अल्पवयीन मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं अन् तिला घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीने मुलीने याप्रकरणी महिला हेल्पलाईनकडे मदत मागितली आहे. तसेच आपल्या कुटुंबीयांविरोधात आरोप केले आहेत. ज्यामध्ये तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले जात असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, याप्रकरणी तेरस राम यांनी तक्रार दाखल केली होती. तर मुलीला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तेरस राम यांनी आपल्या मुलीच्या अपहरणाची केस दाखल कलेली होती.
तेरस राम यांच्या आरोपानुसार, त्यांचा जावई कृष्णा राम हा त्यांची लहान मुलीला फसवून घेऊन गेला आहे. तर या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलगी ही हेल्पलाईनमध्ये पोहोचली आणि तिने वडील जबरदस्तीने आपला बालविवाह करत असल्याचं म्हटलं आहे. कृष्णा राम यांचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण त्याला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहायला आली होती. तिने पुन्हा सासरी जाण्यास नकार देताच. पतीने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचललं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.