भुवनेश्वर - ओदिशामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात व्यापक कारवाई होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, अॅडिशनल एसपी ऑफ पोलीस त्रिनाथ मिश्रा यांच्या ११ मालमत्तांवर कटक व्हिजिलेंसने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये ११.२ कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त केली आहे. त्रिनाथ मिश्रा यांना अटक करण्यात आले आहे.
या संपूर्ण कारवाईबाबत व्हिजिलेंस एसपी अक्ष्या मित्रा यांनी सांगितले की, आरोपी त्रिनाथ मिश्रा यांच्याकडून चाल फ्लॅट, सात महागड्या गाड्या सापडल्या आहे. तसेच कुठल्याही वस्तूचे बिल ते सादर करू शकलेले नाहीत. आरोपीला महागड्या गाड्यांचा शौक होता. त्याच्याकडूनं १.११ कोटी रुपयांपर्यंतच्या महागड्या गाड्या आणि स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
डिरेक्ट्र व्हिजिलेंस यशवंत जेठवा यांनीही ही कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची टीम दोन पद्धतीने काम करत आहे. जर त्यांना काही इनपूट मिळाले तर त्या आधारावर सापळा रचून आरोपीला पकडले जात आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.
त्रिनाथ मिश्रा यांच्याकडून नवरंगपूर जिल्ह्यातील डाबुगां येथे वडिलोपार्जित घर आहे. बीएमडब्ल्यू एक्स७ गाडी आहे. तसेच महागड्या दुचाकीही त्यांच्याकडे सापडल्या आहेत. त्याशिवाय कटकच्या मधुपटना ठाण्याच्या हद्दीत त्यांचे सरकारी निवासस्थानही आहे.
तापूर्वी तपास यंत्रणांनी ओदिशा पोलीस हौसिंग अँड वेल्फेयर कॉर्पोरेशनविरोधात कारवाई केली होती. तेव्हा अधिकारी प्रताप सिंह सलाम यांच्याकडून १४.८८ कोटी रुपयांची संपत्ती सापडली होती.