- संतोष वानखडे वाशिम - आसेगांवपेन ता. रिसोड येथे तालुकास्तरीय समितीने धाड टाकुन बोगस वैद्यकिय व्यवसाय करणारे पवन प्रदिप खानझोडे (२९) यास रंगेहात पकडले.
पवन खानझोडे हे आसेगांव पेन या गावामध्ये बरेच दिवसापासुन खाजगी अवैध वैद्यकिय व्यवसाय करीत असल्याबाबत जिल्हास्तरावर तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकिय व्यवसाय करण्याबाबत शहानिशा केली असता, वैद्यकिय व्यवसायीकांनी कोणत्याही प्रकारचे वैद्यकिय शिक्षण घेतलेले नाही व त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकिय पदवि प्रमाणपत्र आढळुन आले नाही.
बोगस खाजगी वैद्यकिय व्यवसायीक आसेगांवपेन मध्ये आपला दवाखाना राजरोसपणे चालवित असुन जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचे आढळून आले. तालुका स्तरीय समीतीने दवाखाण्याची पाहाणी कली असता, संबंधित व्यवसायीकाकडे मुबलक प्रमाणात औषधे, इंजेक्शन आढळून आले. सदर औषधी साठा जप्त करण्यात आला असुन पवन खानझोडे याच्यावर बोगस डॉक्टर कार्यवाही तालुकास्तरीय समिती मार्फत पोलिस स्टेशन रिसोड येथे रितसर गुन्हा नोंदविण्यात आला.