शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

आईवर लहानपणी झाला होता बलात्कार; लेकाने तब्बल 28 वर्षांनंतर 'असा' मिळवून दिला 'न्याय'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:07 PM

Crime News : एका मुलाला आपल्याला पालकांनी दत्तक घेतलं हे समजलं. तेव्हा त्याने त्याच्या जन्माचं रहस्य शोधून काढलं आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेवर ती लहान असताना बलात्कार झाला होता. पण आता तब्बल 28 वर्षांनी तिच्या लेकाने तिला न्याय मिळवून दिला आहे. एका मुलाला आपल्याला पालकांनी दत्तक घेतलं हे समजलं. तेव्हा त्याने त्याच्या जन्माचं रहस्य शोधून काढलं आहे. त्याने आपल्या खऱ्या आईचा शोध घेतला. त्याला आईसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. यानंतर तो आईसाठी लढला आणि तिला न्याय मिळवून दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1994 मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी 12 वर्षांची मुलगी तिच्या बहिणीसोबत राहत होती. तिची बहीण एका खासगी शाळेत शिकवत होती. एके दिवशी वस्तीतील नकी हसन उर्फ ​​ब्लेडी ड्रायव्हरने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्याचा दुसरा भाऊ मोहम्मद रझी उर्फ ​​गुड्डू याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा हरदोई येथील एका जोडप्याला दिला गेला.

तब्बल 27 वर्षांनंतर मुलाला त्याच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्याला वाढवणाऱ्या व्यक्तीने त्याला त्याच्या आईचं नाव सांगितलं. त्यानंतर मुलाने आईला शोधून तिची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने त्याला तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. पीडितेने मुलाच्या सांगण्यावरून आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाची मदत घेतली. 4 मार्च 2021 रोजी महिलेने न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

शहाजहानपूरचे एसएसपी एस. आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "खूप तपास केल्यानंतर दोन्ही आरोपींबाबत माहिती मिळाली. अनेक पथके तयार करण्यात आली. 48 वर्षीय मोहम्मद रझी हैदराबादमध्ये लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचे लोकेशन ओडिशामध्ये सापडले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी