नवी दिल्ली - छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाईमध्ये एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तिच्याच एका मैत्रिणीनं हा भयंकर प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला फोन केला होता.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेकवेळा फोन करूनही प्रियकर भेटायला आला नसल्याची माहिती तरुणीने फोनवर दिली होती. त्यानंतर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. व्हॅलेंटाईन डेला प्रियकर भेटायला आला म्हणून तरुणीने खोलीत आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथे घडली आहे. तर दिक्षा असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती मूळची दंतेवाडा जिल्हातील बचेली येथील रहिवासी होती.
भिलाई येथे महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. तसेच येथेच पीजीमध्ये राहत होती. व्हॅलेटाइन डेच्या दिवशी तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावलं होतं. पण तिचा प्रियकर तिला भेटायला आला नाही. तिने अनेकदा विनवण्या केल्यानंतरही त्याने भेटायला येण्याचं टाळलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणीने आपल्या एका मैत्रिणीला फोन करून घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. मैत्रिणीने तिची फोनवरून समजूत घातली. त्यानंतर काही वेळाने मैत्रिणीने पुन्हा तिला फोन केला. पण तिने फोन उचलला नाही.
मैत्रीण तरुणीला भेटण्यासाठी तिच्या रूमवर आली. यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हा प्रकार पाहताच मैत्रिणीने तातडीने या घटनेची माहिती नेवई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांना दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस तरुणीच्या प्रियकराचा शोध घेत होते. या घटनेचा पुढील तपास नेवई पोलीस करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.