Crime News : एकतर्फी प्रेमातून मुलीवर झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून आरोपीचं घर जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:55 PM2021-09-03T14:55:18+5:302021-09-03T15:01:14+5:30

Crime News : मोतीनगर ठाणे क्षेत्रात दिवसाढवळ्या एका युवतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर, प्रशासनाने आरोपीच्या 15 क्वेअर फूटाच्या घरावर बुलडोझर चालवून ते घर जमीनदोस्त केलं.

Crime News : Bullets fired at the girl out of one-sided love, the house of the accused was demolished by the police | Crime News : एकतर्फी प्रेमातून मुलीवर झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून आरोपीचं घर जमीनदोस्त

Crime News : एकतर्फी प्रेमातून मुलीवर झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून आरोपीचं घर जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देगुरुवारी दुपारी शास्त्री वार्डमधील पगारा रोडवर आरोपी रोहित राजपूत या तरुणाने गल्लीतीलच पूनम केसरवानी या युवतीला रस्त्यातच अडवले, त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली.

भोपाळ - एकतर्फी फ्रेमातून एका माथेफिरु प्रियकराने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. येथील सागर शहरातील ह्या प्रेमवेड्याने चक्क गोळ्या घालून मुलीची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी एका तासातच आरोपीचं घर गाठलं. त्यानंतर, आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरविण्यात आला असून ते घर जमीनदोस्त केलं आहे. या कारवाईतून गुन्हेगारांसाठी कडक संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

मोतीनगर ठाणे क्षेत्रात दिवसाढवळ्या एका युवतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर, प्रशासनाने आरोपीच्या 15 क्वेअर फूटाच्या घरावर बुलडोझर चालवून ते घर जमीनदोस्त केलं. गुन्हेगारांनी यातून धडा घ्यावा, असे पोलिसांनी म्हटलं आहे. गुरुवारी दुपारी शास्त्री वार्डमधील पगारा रोडवर आरोपी रोहित राजपूत या तरुणाने गल्लीतीलच पूनम केसरवानी या युवतीला रस्त्यातच अडवले, त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. आरोपीने घटनास्थळावरच पिस्तुल सोडून तेथून पोबारा केला. याबाबत माहिती मिळताच आयजी अनिल शर्मा, एसपी अतुल सिंह यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. 

दरम्यान, रोहितने 4 महिन्यांपूर्वीही मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, पूनमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तुरुंगात टाकले होते. मात्र, कोर्टातून जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची सुटका झाली. त्यानंतर, काही दिवसांत त्याने हे कृत्य केले. त्यामुळे, प्रशासनाने रोहितचे घर पाडण्याची कारवाई केली आहे.

Web Title: Crime News : Bullets fired at the girl out of one-sided love, the house of the accused was demolished by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.