पाटणा - अनैतिक संबंधांच्या भयानक शेवटाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यात ठेकेदार जयप्रकाश साह याच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मोतिहारी पोलिसांनी हत्याकांडाचा ४८ तासांत छडा लावला. तसेच ठेकेदार जय प्रकाश याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी या हत्याकांडाप्रकरणी राजदच्या महिल नेत्या पल्लवी ठाकूर उर्फ निराली, तिचा ठेकेदार पती अवनीश सिंह आणि एका अन्य गुन्हेगार राजीव सिंह याला अटक केली आहे. पोलिसांनी मोतिहारीनगरच्या श्रीकृष्णनगरमध्ये छापेमारी करून या हत्याकांडाचा छडा लावला.
याबाबत एसपी डॉ. कुमार आशिष यांनी सांगितले की, ठेकेदार अवनीश सिंह यांची पत्नी पल्लवी ठाकूर हिच्यासोबत जयप्रकाश याचे अनैतिक संबंध होते. ही बाब अवनीशला खटकत होती. त्याशिवाय ठेकेदारीच्या अंतर्गत स्पर्धेतूनही जयप्रकाश याचे विरोधक एकजुट झाले होते. अनैतिक संबंध आणि विरोधकांची साथ मिळाल्यानंतर जयप्रकाश याला वाटेतून हटवण्याचा मार्ग मिळाला. त्यानंतर शूटरच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले. लायनर अवनीश सिंह आणि त्याची पत्नी पल्लवी ठाकूर हे राहिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोतिहारीच्या बरियापूर येथील घरातून पाटणा येथे निघालेल्या जयप्रकाश याला बरियारपूर चौकामध्ये अवनीशने लस्सी पाजून निरोप दिला. त्यानंतर शार्पशूटरना फोन करून जयप्रकाशच्या पाटणा येथे जाण्याचा कार्यक्रम आणि थांबण्याच्या ठिकाणांची माहिती दिली. त्यानंतर शूटरनी गोळ्या घालून त्याची हत्या केली.
जयप्रकाशचे पोट, छाती आणि गळ्याला एकूण सहा गोळ्या लागल्या. तर त्याच्या शेजारी असलेल्या ड्रायव्हर राधेश्याम यादव याला तीन गोळ्या लागल्या. तिथून राधेश्याम याने ३८ किमी कार चालवत जयप्रकाश याला रुग्णालयात पोहोचवले. मात्र वाटेतच जयप्रकाश याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी ४८ तासांतच गुन्ह्याचा छडा लावला.
दरम्यान, हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली जयप्रकाशची प्रेयसी आणि राजद नेत्या पल्लवी ठाकूर उर्फ निराली, तिचा ठेकेदार पती अवनीश सिंह आणि राजीव सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर हत्या करणाऱ्या शूटरना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.