शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Crime News: मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारच्या धाडीत ३२ जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 3:33 PM

Crime News: मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप लगत असलेल्या गंधर्व ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नाच चालत असल्याचे नया नगर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले असून बारबालांसह ग्राहक , बार कर्मचारी असे ३२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 मीरारोड - मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप लगत असलेल्या गंधर्व ह्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नाच चालत असल्याचे नया नगर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले असून बारबालांसह ग्राहक , बार कर्मचारी असे ३२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सदर ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबाला ह्या ग्राहक पुरुषांशी लगट करून अश्लील व बीभत्स नाच करत असल्याची माहिती मिळाली . त्यांनी पोलीस पथकास कारवाई साठी पाठवल्यावर २७ जूनच्या रात्री ११ च्या सुमारास पोलीस पथकाने गंधर्व बार वर छापा टाकला . बार मधून अश्लील नाच करणाऱ्या ४ बारबालां सह बार मधील १२ ग्राहक , बारचे १६ कर्मचारी असे एकूण ३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

बार मधून १२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे . जप्त रोकड मधील नोटा ह्या २० रुपयांच्या असून बारबालां वर उधळण्यासाठी त्या वापरल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले .  सदर बार वर ह्या आधी देखील अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे . शहरातील ऑर्केस्ट्रा बार च्या आड सर्रास अश्लील नाच सुरु असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे .  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी