नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. पंजाबच्या मुक्तसरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुणाला पगार मागणं चांगलंच महागात पडलं आहे. पगार मागितला म्हणून ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करून दोन जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण गेल्या कित्येक महिन्यांपासून आपला पगार मागत होता. याआधीही त्याने पगार मागितला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती.
तरुणाने पुन्हा एकदा पगार द्या असं म्हटलं असता त्याला टॅक्टरला बांधण्यात आलं आणि बेदम मारहाण करण्यात आली. ज्यानंतर त्याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा तब्बल 9 महिन्यांचा पगार शिल्लक आहे. जवळपास 1 लाख 80 हजार रुपये आहेत. जेव्हा तरुणाने आरोपीकडे पगार मागितला तेव्हा त्याने फक्त 30 हजार रुपये दिले. पूर्ण पगार मागितला असता आरोपीला राग आला. त्याने संतापाच्या भरात तरुणाला ट्रॅक्टरला बांधलं आणि बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सुखचैन सिंह उर्फ सोनू आणि वकील सिंह या दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या आवलाचे खासदार धर्मेंद्र कश्यप उत्तराखंडच्या जागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात घातलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाली असल्याचं पुजाऱ्यांनी खासदारांना सांगितलं. मात्र म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांना दम आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धर्मेंद्र कश्यप यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
धक्कादायक! भाजपा खासदाराचं मंदिरात गैरवर्तन, पुजाऱ्यांना केली शिवीगाळ; Video जोरदार व्हायरल
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कश्यप पुजाऱ्यांना दम देताना तसेच शिवीगाळ करताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 31 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तीन जण दुपारी 3.30 च्या दरम्यान मंदिरात आले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ते मंदिरात बसून होते. सध्या कोरोना निर्बंधामुळे हे मंदिर संध्याकाळी सहा वाजता बंद होतं. मंदिर प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार, पुजाऱ्यांनी खासदारांना मंदिरातून बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गैरवर्तन करत शिवीगाळ केली. खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.