उत्तराखंडच्या डेहरादूनमध्ये हैरान करणारा प्रकार समोर आला आहे. एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेलेल्या पुरोहिताने सलून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. कारण त्याने केस कापताना त्या पुरोहिताची शेंडीच कापली. (dehradun panditji braid cut barber shop hair cut police fir)
डेहरादूनमध्ये एका सलूनमध्ये एक पुरोहित केस कापण्यासाठी गेला होता. तेथील न्हाव्याने पुरोहिताची शेंडी कापली. परंतू त्या पुरोपिताला तेव्हा काहीच समजले नाही. पैसे देऊन तो बाहेर पडला आणि घरी आला. घरी पोहोचल्यावर दोन तासांनी त्याला शेंडी नसल्याची जाणीव झाली. मग काय संतापाने लालेलाल झालेला पुरोहित सलूनमध्ये आला आणि वाद सुरु झाला. त्या केस कापणाऱ्याने वाढत चाललेला वाद पाहून पुरोहिताची माफी मागितली. मात्र, तरी देखील पुरोहिताचा राग शांत झाला नाही.
पुरोहित त्याची शेंडी कापल्याने एवढ्या रागात होता की, त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. नेहरू कॉलोनी पोलीस ठाण्यात त्या सलूनवाल्यावर गुन्हा दाखल केला. हा सलूनवाल्याचे नवादामध्ये भावेश जेंट्स सलून आहे. पंडीत शिवानन्द कोटनाला हे रविवारी त्याच्याकडे गेले होते. त्यांनी केस कापल्यानंतर रंग लावला व घरी आले. हा रंग सुकल्यानंतर ते अंघोळीला गेले. केस धूत असताना त्यांना शेंडी नसल्याचे जाणवले. यामुळे ते सलूनमध्ये गेले आणि वाद झाला. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी सांगितले की, सलून मालक भावेश विरोधाच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी, शिवीगाळ, मारहाण आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.