जायकवाडी (औरंगाबाद) : ‘तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे प्रेमपत्रात लिहून तरुण अभियंत्याने पिंपळवाडी (ता. पैठण) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. निखिल दत्तात्रय चौंडाळे (२५, मूळगाव - पंढरपूर, ह. मु. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. निखिल हा एमआयडीसी पैठण येथील एका कंपनीत नोकरी करीत होता. सोमवारी सकाळी तो घराच्या बाहेर न पडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना खोलीत काही प्रेमपत्रे आढळून आल्याने प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, एका पत्रात ‘तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Crime News: ‘तेरे बिन नहीं जीना...’ असे लिहून अभियंत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 9:28 AM