शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

Crime News: उत्तराखंडमध्ये भीषण चकमक; भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, 3 पोलिसांना लागल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 2:25 PM

पोलीस आणि खाण माफियांमध्ये झालेल्या चकमकीत निष्पाप महिला मृत्यूमुखी पडली आहे. वाचा संपूर्ण घटनाक्रम...

मुरादाबाद:उत्तराखंडमध्ये पोलीस आणि खाण माफियांमध्ये भीषण चकमक झाल्याची घटना घडली आहे. खाण माफियांचा पाठलाग करत उत्तराखंडमध्ये पोहोचलेल्या यूपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत भाजप नेत्याची पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही महिला ड्युटीवरून परतत असताना गोळीबार झाला. खाण माफिचाची खबर मिळताच यूपी पोलिसांनी सापळा रचला होता, मात्र चकमकीदरम्यान माफियांनी सुमारे एक तास 12 पोलिसांना ओलीस ठेवले. यादरम्यान, पोलिसांची गाडी जाळली आणि त्यांची शस्त्रेही लुटली. या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

नेमकं काय झालं, वाचा घटनाक्रम...खाण माफिया जफर मुरादाबादच्या ठाकुरद्वारा परिसरात असल्याची माहिती बुधवारी दुपारी यूपी पोलिसांना मिळाली होती. सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जफरने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. स्वत:ला वेढलेले पाहून जफरने यूपीची सीमा ओलांडली आणि उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील कुंडा पोलिस ठाण्याच्या भरतपूर गावात पोहोचला. यूपी पोलिसांचे पथकही पाठलाग करत भरतपूरला पोहोचले. बरेली झोनचे एडीजी राजकुमार यांनी सांगितले की, माफिया जफर भरतपूरमधील भाजप नेते गुरताज सिंह यांच्या फार्म हाऊसवर लपला होता. ठाकूरद्वारा पोलीस स्टेशन ते भरतपूर हे अंतर जेमतेम 8 किलोमीटर आहे.

साध्या वेशात पोलीस दाखल झाले यूपीचे पोलीस कर्मचारी साध्या वेशात होते. काही व्हिडिओंमध्ये भुल्लरच्या फार्महाऊसमध्ये 10-12 लोक पिस्तुल घेऊन घुसताना दिसत आहेत आणि तेथे साध्या वेशातील पोलिसही होते. सुरुवातीला भुल्लरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना येऊ दिले नाही. मात्र, मुरादाबाद पोलिसांच्या पथकाने आपली ओळख पटवून दिली आणि फार्म हाऊसमध्ये घुसलेल्या जफरला बाहेर येण्यास सांगितले. मात्र भुल्लरच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना बोलावण्याची मागणी सुरू केली. यादरम्यान, स्थानिकांनीही युपी पोलिसांना विरोध सुरू केला.

ड्युटीवरून परतणाऱ्या महिलेवर गोळी झाडलीहा वाद सुरू असताना पोलिसांना माफिया जफर दिसला, त्यानंतर गोळीबार सुरू झाला. यावेळी भुल्लरची पत्नी गुरजित कौर (28 वर्षे) या ड्युटीवरून परतत होत्या. चकमकीत त्यांना गोळी लागली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुरादाबाद पोलिसांकडून गोळी लागल्याने गुरजीतचा नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेत उत्तराखंडच्या कुंडा पोलिस ठाण्यात मुरादाबादच्या 4 पोलिसांची नावे घेत 10-12 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जफरने पोलिसांना ओलीस ठेवले, गावकऱ्यांनी गोंधळ घातला13 सप्टेंबर रोजी एसडीएम टीमला ओलिस करून डंपर पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांना खाण माफिया जफर हवा होता. दरम्यान, महिलेच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ संतापले आणि याय नाराजीचा फायदा घेत जफर पळून गेला. उत्तराखंडमधील कुंडा तिराहात गावकऱ्यांनी नाकेबंदी करून गोंधळ घातला. यानंतर पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपी पोलिसांनी काही गावकऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत 5 पोलीस जखमी झाले असून, 3 जणांना गोळ्या लागल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशUttarakhandउत्तराखंडPoliceपोलिसBJPभाजपा