- नरेश रहिलेगोंदिया - रामनगर पोलीस ठाण्यानतर्गत येणाऱ्या कटंगीकला येथील महिलांना घरासाठी लोन मिळवून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रूपये गोळा करणाऱ्या गड्डाटोली येथील एका महिलेवर रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदियाच्या कटंगीकला येथील रस्तकला धनंजय कठाने (४५) यांंनी रामनगर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ओळखीची महीला अनिता मदारे (४५) रा. कटंगीकला हिने जानेवारी २०१६ मध्ये ज्योती राजेश गर्ग (३८) रा. गड्डाटोली गोंदिया हिच्यासोबत त्यांच्या घरी आल्या. आयसीआयसीआय बॅंकेतून लोन काढून देते यांना मी ओळखते असे सांगितले.
१५ मे २०१६ रोजी दुपारी १२ वाजता त्या कटंगीटोला येथे रस्तकला यांच्या घरी आल्या. मी नागपूरच्या आयसीआयसीआय बँक येथुन तुम्हाला ५० टक्के सबसीडीवर लोन मिळवून देते. एक लाख रूपये कर्ज घेण्यासाठी दिड हजार रूपये कमीशन लागेल आणि अकाऊंटमध्ये १० हजार रूपये डीपॉजीट ठेवावे लागतील असे सांगितले. त्या दिड हजार रूपये घेऊन गेल्या. काही दिवसाने तुमचा लोन मंजूर झाला तुम्हाला १० हजार रूपये द्यावे लागतील असे म्हणाल्या. त्यांनी इकडून-तिकडून १० जार जमा करून तिला दिले. तीन महिन्यानंतर आली तुम्हाला ५ लाखाचा लोन मंजूर झाला त्याचे कमीशन ४ हजार ५०० रूपये व स्टॅम्प करीता ३ हजार असे एकुण ७ हजार ५०० रूपये द्यावे लागतील. असे म्हटले. तिला ७ हजार ५०० रूपये, कोटेशनचे एक हजार असे संपूर्ण २० हजार रूपये ज्योती राजेश गर्ग हिला दिले. परंतु तिने आजपर्यंत रस्तकला कठाणे यांंना बँकेतून लोन मिळवून दिले नाही. घर तयार करण्याकरीता पैशाची गरज असल्याने तिच्यावर विश्वाश करुन लोन मिळेल या आशेने रस्तकला यांनी तिला टप्याटप्याने पैसे दिले होते.परंतु तीने १५ सप्टेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या काळात त्यांची फसवणूक केली. तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.
या १४ लोकांची केली फसवणूककटंगीकला येथील गावातील कटंगीटोला येथील रस्तकला धनंजय कठाने (४५), लिला सेवकराम वरखडे (४६) यांची ४० हजार, रेवन निलम उईके (६०) यांच्याकडुन २० हजार, नानता सदुलाल पारधी (५२) १५ हजार, गीता राजू रामटेके (५०) यानच्याकडून १५ हजार, दुर्गेश्वरी मोहनलाल पगरवार (४०) १० हजार, मनोरमा तेजराम देशभरतार (६०) १५ हजार, शामकला रमन सावतवान (३०) यांच्याकडू ५ हजार, हसीना रहीम शेख (४८) यांच्याकडून १२ हजार, फरीदा करीम शेख (२६) यांच्याकडून २ हजार, आशा धरमदास भालाधरे (६०) यांच्याकडून ३० हजार, महमुदा सब्बीर शेख (५०) हिच्याकडून १५ हजार, सुरोज मनिष मडामे (४०) यांच्याकडून १५ हजार, अंजना विजयकुमार मडामे (५०) यांच्याकडून ५ हजार, तर पांढराबोडी नवेगाव येथील अश्विन याच्याकडून ८ हजार असे एकुण २ लाख २७ हजार रूपयाची फसवणूक केली.