- रुपेश हेळवेसोलापूर : पालखी मार्गावरील सिमेंट क्राँक्रेटी करणाच्या कामाचे बिल काढण्यासाठी तीन टक्के कमिशन मागणाऱ्या माढा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे. हणुमंत उद्धव कदम (वय ४४, रा. माढा, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
तक्रारदाराचे मित्र हे कंत्राटदार असून त्यांनी मौजे उजनी, माढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगांतर्गत पालखीमार्गात सिमेंट काँक्रिटीकरण केले हाेते. या कामाचे बिल काढण्यासाठी एकूण बिलाच्या ३ टक्के म्हणजेच ८४०० रुपयांची मागणी ग्रामसेवक कदम याने केली. याबाबत एप्रिलमध्ये पडताळणी झाली. त्यात मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामसेवक हनुमंत कदम याला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.