शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

भयंकर! संपत्तीच्या हव्यासापोटी मुलगीच झाली हैवान; पित्याची डोक्यात वीट घालून केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 8:39 AM

Crime News : केयाचा वडिलांसोबत संपत्तीवरुन वाद सुरू होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती

नवी दिल्ली -  पश्चिम बंगालमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी एका मुलीनेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात वीट घालत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कालीपद दास (83) असं मृत वडिलांचे तर केया दास( 40) असं आरोपी मुलीचं नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केया दास हिचा घटस्फोट झाला असून सध्या ती हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा भद्रकाली येथील प्रशांत दत्ता सरानी भागातील वडिलांच्या घरी आपल्या मुलासोबत राहते. केयाचा वडिलांसोबत संपत्तीवरुन वाद सुरू होता. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी केया आणि कालीपद यांच्या संपत्तीवरुन भांडण झाले. यानंतर कालीपद हे अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले. त्यावेळी केयाही त्यांच्या पाठोपाठ बाथरुममध्ये गेली आणि आपल्या डोक्यात जड वस्तू घालून वार केला. यात कालीपद यांचा मृत्यू झाला. 

केयाचा मुलगा अभिषेक घटनेनंतर फरार

कालीपद दास हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे बाथरूममध्ये कालीपाद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. केयाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चंदननगर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी डॉ. अरविंद आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा वडिलांसोबत मालमत्तेचा वाद सुरू होता, त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. तर केयाचा मुलगा अभिषेक घटनेनंतर फरार झाला आहे. 

संपत्तीसाठी मुलीने जन्मदात्या वडिलांचाच काढला काटा

पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तरपारा-कोटरंग नगरपालिकेचे प्रशासक दिलीप यादव घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटीत केया आपल्या मुलासोबत वडिलांच्या घरी राहत होती आणि त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यामुळेच तिने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा काटा काढला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस