नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेल्या एका भाजपा नेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर चोरीचा आरोप आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचा युवा नेता सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका दुकानातून चोरी करत असल्याचं दिसून येत आहे. या युवा नेत्याने NIT मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुकानातून गाडीच्या लाइट्स, डाटा केबल, मोबाईल चार्जर स्टँड आणि एलईडी लाइट्ससह 18 हजार रुपयांचं सामान चोरी केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेलं सर्व सामान जप्त केलं आहे.
हमीरपूर न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं. या प्रकरणात हमीरपूरमधील वॉर्ड नंबर 9 मधील राहणारे सुभाष चंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीने एनआयटी हमीरपूरमधून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पोलीस अधिक्षक डॉ. आकृती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चोरीच्या आरोपात हमीरपूरमधील मुकुल ठाकूरला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवराज सरकारमध्ये (Shivraj Government) मंत्री असलेल्या कुंवर विजय शाह यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री कुंवर विजय शाह एका मुलीकडे लक्ष ठेवण्याबद्दल एका महिला अधिकारीला सांगत आहेत. याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झालेला पाहायला आहे. "ही विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून हिच्याकडे लक्ष द्या" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून काँग्रेसनेही त्यावर टीकेची झोड ठवली आहे.