शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भयंकर! सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 1:59 PM

Crime News : सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. डॉक्टरच्या चार पानी सुसाईड नोटने परिसरात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. डॉक्टरच्या चार पानी सुसाईड नोटने परिसरात खळबळ उडाली आहे. "मला जगायचं होतं पण त्यांनी मला जगू नाही दिलं" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील डॉ. गौरव गुप्ता यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी गौरव यांनी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट आणि विषारी इंजेक्शन सापडलं आहे. सुसाईड नोटनमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

डॉ. गौरव कुमार गुप्ता हे रेल्वेमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. साधारण आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह डॉ. अनिल गुप्ता यांची मुलगी शैली गुप्ता हिच्याशी झाला होता. डॉ. गौरव गुप्ता आणि त्यांची पत्नी शैली यांच्यात वाद होत होते, पण शैली यांचे वडील डॉ. अनिल गुप्ता आणि शैली यांची बहिण नेहा त्यांना मानसिक त्रास देत होते. घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करण्यासाठी दबाव आणत होते. आपल्या कुटुंबीयांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी देत होते, हाच त्रास आता सहन होत नाही असं डॉ. गुप्ता यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. 

"मला जगायचं होतं पण त्यांनी मला जगू नाही दिलं"

डॉ. गुप्ता यांनी सुसाईड नोटमध्ये आपले सासरे आणि मेहुणी आपल्याला कसा मानसिक त्रास देत होते याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लग्नापासून आजपर्यंतच्या अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. चार पानांमध्ये त्यांनी पत्नी शैलीसाठी सर्व काही सहन करत राहिल्याचे म्हटले आहे. आपल्याला जगायचे होते, पण या लोकांनी जगू दिलं नाही. आपल्याला आत्महत्या करायला भाग पाडलं आहे. यासाठी आपले सासरे, मेहुणी आणि पत्नी शैली हिलादेखील कठोर शिक्षा व्हावी असं त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. डॉक्टर गुप्ता सोमवारी रात्री आपला मित्र महेंद्र याच्या नर्सिंग होममध्ये गेले. रात्री ते तिथेच एका खोलीत राहिले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्रेमासाठी काय पण! लुडो खेळता खेळता दिरावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं पण भलतंच घडलं 

प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ऑनलाईन लुडो खेळताना दिराच्याच प्रेमात वहिनी पडल्याची घटना समोर आली आहे. दीर आणि वहिनी एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की एकमेकांसाठी दोघांनीही घरदार सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. महिला पतीला सोडून पळून गेली आणि आपल्या दिरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. लवकरच लग्न करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र लग्न होण्यापूर्वीच दीर अचानक गायब झाल्याची घटना समोर आली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारतPoliceपोलिस