फरिदाबाद (हरियाणा) - हरियाणामधील फरिदाबाग जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका मद्यपी पतीने मद्यपान करण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पतीने क्रूर शिक्षा दिली आहे. (Crime News) या मद्यपी पतीने मद्यपानास नकार देणाऱ्या पत्नीचे तोंड चुलीतील आगीत घातले. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला गंभीर अवस्थेत बीके रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथून या महिलेला अधिक उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या महिलेला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. (Husband punishes wife for refusing to drink alcohol, he put her mouth in the burning fire)
मिळालेल्या माहितीनुसार अलिगडमधील जटौला गावातील कल्पना या महिलेचा विवाह पाच वर्षांपूर्वी बुलंदशहरातील लालनेर येथील पिंकू हिच्याशी झाला होता. ही महिला येथील खेडी कलामध्ये भट्टीवर मजुरी करते. दरम्यान, तिचा पती तिला मारहाण करतो, त्याला मद्यपानाची सवय आहे, असा आरोप या महिलेने केला आहे.
या घटनेबाबत सांगताना ही महिला म्हणाली की, त्या रात्री ती जेवण बनवत होती. तेव्हा तिचा पती मद्यपान करून आला. तसेच मद्यपानासाठी आग्रह करू लागला. मात्र तिने मद्यपानास नकार दिला तेव्हा आरोपीने तिचे डोके पकडून जिवे मारण्याच्या हेतूने चुलीतील आगीमध्ये घातले. त्यामुळे तिचा चेहरा जळाला. नंतर तिचा पती तिला जिवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून फरार झाला.
दरम्यान, या महिलेने आरडाओरडा केल्यावर तिचा भाऊ घटनास्थळावर आळा. त्याने या महिलेला खेडीपुल चौकाजवळ असलेल्या एका रुग्णालयात नेले. तिथे घटनेची माहिती मिळताच महिलेचे काका फरिदाबाद येथून आल आणि त्यांनी तिला बीकेमध्ये भरती केले. बीके येथून या महिलेला सफदरजंग रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिला आयसीयूमध्ये भरती करण्यात आलेले आहे.