शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

संतापजनक! फिरायला चल असं सांगून पतीने बाहेर नेलं; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 10:14 AM

Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे. एका तरुणाने आपल्यासोबत फिरायला चल असं सांगून बाहेर नेलं आणि नंतर गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं आहे. महिला गंभीर अवस्थेत रात्रभर ट्रॅकवर पडून होती. त्यानंतर सकाळी काही लोकांनी महिलेला अशा अवस्थेत पाहिलं आणि तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने चालत्या ट्रेनमध्ये आधी तिचा गळा दाबला. त्यानंतर तिला ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती रेल्वे ट्रॅकवर पडलेली पाहायला मिळाली. नेहा असं या महिलेचं नाव असून ती गर्भवती आहे. नेहा पंजाबच्या लुधियानामध्ये राहते. ती एका कम्पूटर इन्स्टीट्यूटमध्ये टीचर म्हणून काम करत होती. तिथेच ज्ञानचंद शर्मा नावाचा तरुण शिकायला यायचा.

लग्नानंतर वारंवार छोट्यामोठ्या कारणांवरून वाद

क्लासमध्ये नेहा आणि ज्ञानचंदची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं. लग्नानंतर मात्र वारंवार त्यांच्यात छोट्यामोठ्या कारणांवरून वाद होत होते. सासरची मंडळी मानसिक आणि शारीरीक छळ करायची. सासू हुंड्यासाठी नेहमीच टोमणे मारायची. तसेच मुलाला सुनेबद्दल वाईट गोष्टी सांगून भडकवायची. यानंतर पती आपल्याला मारहाण करत असल्याचं नेहाने म्हटलं आहे. तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. 

चालत्या ट्रेनमध्ये नेहाचा गळा दाबला आणि बाहेर फेकलं

लखनऊला घेऊन जातो असं सांगून पती तिला मनकापूर रेल्वेस्टेशनवर घेऊन आला. त्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये नेहाचा गळा दाबला आणि बाहेर फेकलं. जखमी अवस्थेतील महिलेला स्थानिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी