व्हॉट्स अॅप सगळ्यांच्याच फायद्याचे माध्यम बनले आहे. पण, अनेकजण व्हॉट्स अॅपचा चुकीची वापरही होत आहे, अशीच एक घटना केनियातून समोर आली आहे. एका व्यक्तीने मध्य रात्री आपल्या पत्नीच्या व्हॉट्स अॅपवर एक मेसेज वाचला आणि पत्नीला मारहाण सुरू केली. यात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
संशयाचं भूत डोक्यात शिरलं; मल्टीनॅशनल कंपनीच्या सेल्समॅनला गुन्हेगार बनवलं
पतीने रात्री आपल्या पत्नीच्या मोबाईल फोनवर एक व्हॉट्सअॅप मेसेज पाहिला आणि नंतर तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत तिच्यावर हल्ला केला. पीटर करुंगानी या ४७ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर त्याने हल्ला करून तिची हत्या केली. या जोडप्यात अगोदर कधीही वाद झाला नव्हता. पण जेव्हा पीटरला त्याच्या पत्नीच्या फोनवर धक्कादायक संदेश आला तेव्हा त्यांच्यात जोरदार वाद झाला.
मध्यरात्री दोघांमधील वाद वाढला तेव्हा पीटरने त्याच्या पत्नीवर हल्ला केला, यात पत्नीचा मृत्यू झाला. केनियाच्या सीमेवर असलेल्या कमसाई गावातील ४७ वर्षीय पीटर करुंगानी याने आपल्या पत्नीवर हल्ला केला.
व्हॉट्सअॅप मेसेज पाहून पती लगेच संतापला आणि पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. मध्यरात्रीच्या वादानंतर अवघ्या काही तासांतच पतीने तिच्यावर हल्ला केल्याने महिलेने आरडाओरडा सुरू केला. तिच्या ओरडण्याने शेजारी राहणाऱ्यांची झोप उडाली. शेजारी मदतीसाठी गेले तेव्हा पत्नी मृत अवस्थेत पडली होती, यानंतर पतीचा शोध घेतला तर त्यानेही आत्महत्या केली होती, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे. करुंगानी आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह टर्बो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.