नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या सुनेने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. राजस्थानमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. IAS अधिकाऱ्याच्या सुनेने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यावेळी तिने पोटात खूप दुखत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी बीएल मेहरा यांच्या घरात ही घटना घडली. त्यांची पोस्टिंग अरमेर येथे आहे. त्यांचा मुलगा शिक्षण विभागात एलडीसीमध्ये काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकाऱ्यांची सून प्रियंका (25) हिने 1 जानेवारी रोजी विष घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडली होती. यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रविवारी तिचा मृत्यू झाला. पोलीस आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
1 जानेवारी रोजी प्रियंका आपल्या वडिलांसोबत फोनवर बोलली होती. तिला पोटदुखीचा त्रास होत होता. आत्महत्येच्या वेळी प्रियंका घरी एकटी होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियंकाचं लग्न गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कौटुंबिक जीवनात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र तरीही प्रियंकाने 1 जानेवारी रोजी विष घेतलं आणि तिचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.