शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रेमासाठी काय पण! बँक मॅनेजर डेटिंग App वरील गर्लफ्रेंडवर झाला खूश; ट्रान्सफर केले 5.7 कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 4:12 PM

Crime News : हरीशंकर असं त्याचं नाव असून हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - एका बँक मॅनेजरने डेटिंग अ‍ॅपवरील गर्लफ्रेंडच्या खात्यामध्ये तब्बल 5 कोटी 70 लाख रूपये पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील हनुमंत नगरमधील इंडियन बँक मॅनेजरनं हा कारनामा केला आहे. हरीशंकर असं त्याचं नाव असून हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. इंडियन बँकेच्या झोनल मॅनेजरनं केलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी मॅनेजरला 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार या ब्रँचचा सहाय्यक मॅनेजर आणि क्लार्क याांचाही या प्रकरणात समावेश आहे. 13 ते 19 मे दरम्यान हा प्रकार घडला आहे. सायबर गुन्हेगारांनी आपल्याला एक डेटिंग अ‍ॅप वापरण्याचे प्रलोभन दिले होते असा दावा बँक मॅनेजरनं केला आहे. त्याच्या या दाव्याची सत्यता पडताळण्याचं काम पोलीस करत आहेत. या प्रकरणातील तक्रारीनुसार, 'एका महिला ग्राहकाने 1.3 कोटी रूपये फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत जमा केले होते. त्यानंतर त्याच डिपॉझिटच्या आधारावर महिलेनं 75 लाखांचे कर्ज घेतले. 

महिलेनं सर्व आवश्यक कागदपत्र जमा केले. आरोपी अधिकाऱ्याने या कागदपत्रांमध्ये फेरफार केला. इतकंच नाही तर आरोपीनं अनेक टप्प्यात ओव्हरड्राफ्ट म्हणून 5.7 कोटी रूपये जमा केले. हे सर्व पैसे पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या बँकांच्या 28 खात्यांमध्ये पाठवण्यात आले होती. कर्नाटकातील दोन बँक खात्यामधील 136 व्यवहारांतून हे पैसे पाठवण्यात आले आहेत. हरीशंकरने या प्रकरणात त्याचा सहाय्यक मॅनेजर आणि क्लार्कची मदत घेतल्याचा आरोप आहे. मात्र त्याचे अद्याप स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत. या दोघांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हे सर्व प्रकरण उघड होताच इंडियन बँकेचे झोनल मॅनेजर डीएस मूर्ती यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मॅनेजर हरीशंकर आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या चौकशीत मॅनेजरनं डेटिंगची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याची 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी