संजय देशमुख
जालना - शहरातील एका स्टील कारखान्यावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 300 कोटीं रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं आहे. जालन्यासारख्या ग्रामीण जिल्ह्यात एवढं मोठी बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या छापेमारीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले असून 35 पिशव्यांमध्ये या नोटा भरुन ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या 13 तासांपासून ही रोकड मोजण्याचं काम संबंधित विभागातील अधिकारी करत होते. येथील स्थानिक बँकेत जाऊन ही रोकड मोजण्यात आली आहे.
जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मोजणी रात्री 1 वाजता पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 13 तास ही कारवाई सुरूच होती. या कारवाईत जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर टाच असल्याची माहिती आहे. एसआरजे स्टील, कालिका स्टील, एक सहकारी बँक आणि खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी, डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठानवर प्राप्तीकर विभागाने ही कारवाई केली.
एवढी सापडली मालमत्ता५८ कोटी रोख.१६ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे.३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता१३ तास रोकड मोजली. १ ते ८ ऑगस्ट कारवाई२६० अधिकारी कर्मचारी, १२० वर वाहनांचा ताफा.
‘दुल्हन हम ले जायेंगे’चे वाहनांवर लावले स्टिकर
पथकांनी छापे टाकताना व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना मागमूस लागू नये, छाप्याच्या तयारीची बातमी फुटू नये याची पूर्ण सतर्कता बाळगली. नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत इनाेव्हा कारवर वरनोंवधूच्या नावाचे स्टिकर लावले, तर काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावून त्यांना कोडवर्ड दिले होते.