शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

धक्कादायक! महिला मृत्यूच्या दारात असताना 'डॉक्टर' गेली 'मॉर्निंग वॉक'ला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 11:15 AM

Crime News : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला मृत्यूच्या दारात सोडून महिला डॉक्टर मॉर्निंग वॉकसाठी निघून गेल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

जालना - जालन्यामध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला मृत्यूच्या दारात सोडून महिला डॉक्टर मॉर्निंग वॉकसाठी निघून गेल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाला. जालना शहरातील दरगड हॉस्पिटलमध्ये १३ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी दरगड हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा शहरातील गजानन नगर येथील रहिवासी विकास लिधोरीया यांच्या पत्नीला १३ एप्रिल रोजी जालना शहरातील दरगड हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल केले होते. मात्र डॉक्टर प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव होत असताना देखील त्यावर कोणताही उपाय, उपचार न करता कामाचा फारसा अनुभव नसलेल्या नर्सच्या भरवश्यावर सोडून मॉर्निंग वॉकला निघून गेल्या. 

प्रसूतीनंतर महिलेला रक्ताची अत्यंत गरज होती. पण गरज असतानाही महिला डॉक्टरने नातेवाईकांना रक्त आणण्यास सांगितले नाही. शिवाय, स्वत: ही रक्ताची व्यवस्था केली नाही. प्रसूती झाल्यानंतर त्यांना रक्तस्त्राव होत होता. तो सुध्दा थांबविण्यात आला नाही. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. नातेवाईकांनी याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली. 

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नुकताच अहवाल दिला असून, त्यात महिलेचा मृत्यू हा रक्तस्त्रावामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी हयगय व निष्काळजीपणा केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी विकास लिधोरीया यांच्या फिर्यादीवरून दरगड हॉस्पिटलमधील महिला डॉक्टराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. चाटे हे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरJalanaजालना