शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

डोंबिवलीत भरदिवसा थरार, ज्वेलर्सवर चाकूहल्ला; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 1:14 PM

डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर मन्ना ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बुरखा घालुन एक इसम  दुकानात शिरला.

लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली कल्याण डोंबिवलीत  गेल्या काही दिवसांपासून  दुकानात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.मात्र डोंबिवलीत दिवसाढवळ्या आता ज्वेलर्सवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. याबाबत डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर मन्ना ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बुरखा घालुन एक इसम  दुकानात शिरला. या इसमाने तारकनाथ मन्ना यांच्यावर  हल्ला केला आणि तो तेथून पळून गेला. मन्ना यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुदैवाने या घटनेत मन्ना यांचा जीव वाचला. मात्र हा वार नेमका का करण्यात आला? हे अद्याप समजले नाही असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास  रामनगर पोलीस करत आहेत.