नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. राजस्थानमध्ये ही घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीने कधी तरूणी तर कधी विधवा बनून तब्बल 13 लग्न केली आहेत. फसवणूक करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात बाडमेर पोलिसांना यश आलं आहे. तिने आतापर्यंत 13 तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
लग्नानंतर महिला लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये फसवण्याची धमकी देऊन दागिने आणि पैसे घेऊन फरार व्हायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कधी विधवा असल्याचं सांगायची तर कधी अद्याप आपलं लग्न झालेलं नाही असं सांगून लोकांना गंडा घालायची. बाडमेर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 38 वर्षीय जीयोदेवी सर्वांना फसवणूक फरार व्हायची. तिच्याविरोधात दोन मुलांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. लग्नानंतर दागिने आणि पैसे घेऊन नववधू पळून गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीयोदेवीविरोधात तब्बल 13 वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ती लोकांनी ब्लॅकमेल करून फसवायची अशी माहिती एसएचओने दिली आहे. तसेच अनेक ठिकाणी फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका व्यक्तीला फसवल्यानंतर ती पुन्हा दुसरं लग्न करायची. कधी घटस्फोट झाल्याचं देखील सांगितलं आहे. पोलिसांनी जीयोदेवीला आता अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.