शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

बदल्याची आग! विद्यार्थ्याने शिक्षिकेची तब्बल 101 वेळा चाकूने भोसकून केली निर्घृण हत्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 3:44 PM

Crime News : एका व्यक्तीने शिक्षिकेने 30 वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिची हत्या केल्याची एक घटना समोर आली आहे.

एखाद्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने तब्बल 30 वर्षांनी अपमानाचा बदला घेतला आहे. बेल्जियम राहणाऱ्या एका व्यक्तीने शिक्षिकेने 30 वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिची हत्या केल्याची एक घटना समोर आली आहे. 37 वर्षीय आरोपीने या हत्येची कबुली दिली आहे. 2020 मध्ये या व्यक्तीने प्राथमिक शाळेत आपली शिक्षिका राहिलेल्या महिलेची हत्या केली होती. बेल्जियममध्ये ही घटना घडली असून वकिलांनी याची माहिती दिली.

गुंटर यूवेंट्स असं या आरोपीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका मारिया वेरलिंडेन यांनी 1990 मध्ये आपल्यावर केलेली कमेंट विसरू शकलो नव्हतो. त्यावेळी आपण फक्त सात वर्षांचे होतो. 2020 मध्ये 59 वर्षीय मारिया यांची त्यांच्या घऱात हत्या झाली होती. बेल्जियम पोलिसांनी हजारो लोकांचे डीएनए नमुने घेत तपास केल्यानंतरही हत्येचा उलगडा होत नव्हता. मारिया यांच्या पतीने लोकांना साक्षीदार असल्याच पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. पण काही केल्या हल्लेखोराचा शोध लागत नव्हता.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, 101 वेळा भोसकून मारिया यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पाकिटात असणाऱ्या पैशांना हात लावला नसल्याने चोरीच्या उद्धेशाने हत्या झाली नसल्याचं स्पष्ट होतं. हत्येच्या 16 महिन्यांनी 20 नोव्हेंबरला आरोपीने आपल्या मित्राला हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या डीएनए नमुन्यांची आणि आरोपीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. 

आरोपीने हत्येची कबुली दिली असून सविस्तर माहिती सांगितल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. प्राथमिक शाळेत असताना शिक्षिकेमुळे आपल्याला खूप सहन करावं लागलं असं त्याचं म्हणणं आहे. तपासादरम्यान याची चाचपणी केली जाईल असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक