नवी दिल्ली - हरियाणाच्या सोनीपतमध्ये (Haryana Sonipat) माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. नराधमांनी दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर त्यांनी मुलींना जबरदस्तीने कीटकनाशक देखील पाजलं. यामध्ये मुलींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुंडली पोलीस ठाण्याचे (Kundli Police Station) रवि कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारे चार जण जबरदस्तीने मुलींच्य़ा घरात शिरले. त्यांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. तसेच मुलीच्या आईला याबाबत कोणाला सांगितलं तर जीवे मारू असं धमकावलं. यानंतर आरोपींनी मुलींना कीटकनाशक पाजलं. मुलींची प्रकृती बिघडली. तेव्हा आरोपींनी तिच्या आईला मुलींना साप चावल्याचं सांगितलं. मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी एकीला मृत घोषित केलं. तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने तिने रुग्णालयात साप चावल्याने मुलींची ही अवस्था झाल्याची माहिती दिली होती.
महिलेच्या वागणुकीवर संशय आल्याने रुग्णालयात मुलींबाबत तिची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सत्य सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्टमधून दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याची आणि त्यांच्या शरीरात विष गेल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच पोलिसांना या प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत.
खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे.