शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Crime News: एमएमआरडीएची घरे विकणाऱ्यांना कोठडी, बोगस कागदपत्रांद्वारे केली विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 8:21 AM

Crime News: या टोळीने आतापर्यंत १८ जणांना ते बाधित नसतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून  २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात  उघड झाले.

मुंब्रा : शिळफाटा परिसरातील एमएमआरडीएच्या घरांची बोगस कागदपत्रांद्वारे बाधित नसलेल्यांना विक्री करणे तसेच घरे भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त जगजीत सिंह यांनी  नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजिद शेख आणि रईस काझी या दोन दलालांना अलीकडेच अटक केली. यामुळे आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली असून, न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या टोळीने आतापर्यंत १८ जणांना ते बाधित नसतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे घरे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून  २५ लाख रुपये उकळल्याचे तपासात  उघड झाले. अटक केलेल्यांमधील इमरान जुनेजा हा मास्टरमाइंड असून त्याच्याकडे बोगस लेटरहेड, बोगस स्टॅम्प, रूमच्या बोगस चाव्या आढळून आल्या होत्या. त्याने मुंबईतील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द येथील एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची  फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती तपास पथकाचे प्रमुख अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांनी दिली.दरम्यान, त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेणे सुरु असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे