नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सहा मुलांची आई 14 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना घडली आहे. 40 वर्षीय विवाहित महिला अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नातेवाईक हैराण झाले असून या घटनेने पोलीसही चकीत झाले आहेत. मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात राहणारी महिला आपल्या पतीच्या मित्राच्या 14 वर्षीय मुलासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला पतीपासून सहा मुलं आहेत आणि आता तिचं 14 वर्षीय मुलावर प्रेम जडलं आहे. यानंतर ते पळून गेले होते. तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांनाही शोधून काढलं आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना गावात परत आणण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही पुन्हा एकदा पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
6 मुलांची आई 14 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली अन् पळून गेली
मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेने 14 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहित महिलेसोबत पळून गेलेला मुलगा अमलीखेडा गावचा आहे. मुलाच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मुलाचा जन्मदाखला आणण्यास पोलिसांनी सांगितलं आहे. कुटुंबीयांनी दाखविलेल्या मुलाच्या आधारकार्डनुसार, त्याचे जन्म वर्ष 2007 आहे. यामुळे तो 14 वर्षांचा ठरतो. पण तपासादरम्यान त्याच्या वडिलांशी झालेल्या संभाषणातही तो प्रौढ आहे आणि 1997 मध्ये त्याचा जन्म झाला आहे, असे समोर आले आहे. आम्ही मुलाच्या कुटुंबीयांना त्याचा जन्म दाखला सादर करण्यास सांगितलं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
नातेवाईकही झाले हैराण
पळून गेलेल्या महिलेच्या पतीने मात्र मुलगा आपल्या पत्नीला पळून जाण्याचे आमिष दाखवत होता. त्यामुळेच मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता अशी माहिती दिली आहे. महिलेला सहा मुलं आहेत. गांधीनगरमध्ये मजूर म्हणून काम करत असलेल्या मुलाच्या ती प्रेमात पडली आहे. मुलगा अल्पवयीन आहे की नाही याची अद्याप खात्री पटलेली नाही. यामुळे पोलीस मुलाच्या जन्मदाखल्याच्या प्रतीक्षेत आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.