व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हॉट्सअॅप आता कामाचा भाग बनले आहे. पण, या अॅपच्या माध्यामातून फसवणुकही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हरियाणातून असेच एक प्रकरण समोर आले आहे. रोहतक येथील जगदीश कॉलनीतील गुंडाने नातेवाईकाचा मित्र असल्याचे भासवून 1 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू बुद्धीराजा यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये तरुणाने स्वतःची ओळख प्रांशुल परुथी म्हणून केली होती. प्रोफाईलमध्ये प्रांशुलचा फोटोही लावला. प्रांशुल पारुथी त्याचा जवळचा मित्र आहे.
आरोपीने व्हॉट्स अॅपचा फोटो बदलून नातेवाइकांना मेसेज पाठवला. मित्राच्या नातेवाईकांना मेसेजमध्ये, एका नातेवाईकाचा अपघात झाला होता आणि त्याची प्रकृती रुग्णालयात गंभीर होती. लवकरात लवकर पैसे हवेत. असं म्हटला. नातेवाइकांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नव्हते. हे सर्व संभाषण व्हॉट्सअॅपवरूनच मेसेजद्वारे झाले. यानंतर नातेवाइकांनी लगेच तरुणाच्या खात्यावर 1 लाख 15 हजार रुपये पाठवले. यामध्ये त्यांनी स्वत: 70 हजार पाठवले, तर मित्राला 25 हजार आणि बहिणीला 20 हजार पाठवले. या नंतर त्यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
पतंजली योगपीठ हरिद्वार येथे उपचार करून देण्याच्या नावाखाली डीएलएफ कॉलनीतील महिलेची कोणीतरी 44 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! पुतण्याने चुलतीची हत्या करून मृतदेहाचे केले 10 तुकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएलएफ कॉलनीतील रहिवासी नीलम अरोरा यांनी तक्रारीत सांगितले, त्या अजूनही आजारी आहेत. पतंजली योगपीठात उपचार होणार होते. यासाठी ऑनलाइन बुकिंग केले होते. त्यासाठी ऑनलाइन पैसे पाठवण्यात आले. तेथे पोहोचल्यावर ज्या तरुणाने त्याच्याशी बोलून खाते क्रमांक दिला तो बनावट असल्याचे आढळून आले. रुग्णालयात कोणतेही शुल्क जमा केले नाही. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.